भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण क्रांतिकारी ठरणार - दीपक भालेराव

 भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण क्रांतिकारी ठरणार - दीपक भालेराव

     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६८ साली पहिले शिक्षण धोरण आले त्यानंतर १९८६ साली दुसरे तर तब्बल ३४ वर्षानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आले असून भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी हे धोरण क्रांतिकारी भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन तालुका तज्ज्ञ मार्गदर्शक दीपक भालेराव यांनी केले ते होरायजन अकॅडमी येथे गट शिक्षण अधिकारी राजेश डामसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप प्रसंगी बोलत होते.अध्यक्ष स्थानी समन्वयक संदीप गीते होते.मार्गदर्शक चंद्रशेखर उदावंत,योगेश शेवरे,अंकुश सहाणे,देवबा देवरे,मारुती सोनवणे,संजय खरात,पोपट नागरगोजे आदी मंचावर उपस्थित होते.

     नवीन शैक्षणिक धोरणात बाल वाटिका एक,बाल वाटिका दोन,बाल वाटिका तीन,इयत्ता पहिली,इयत्ता दुसरी हा पायाभूत स्तर निर्माण केला असून पूर्वप्राथमिक शिक्षण प्रथमच सरकारच्या अखत्यारीत येत आहे.पूर्व प्राथमिक स्तराला स्वतंत्र अभ्यासक्रम लागू करण्यात येत असून तो सर्वत्र समान असणार असल्याचे ते म्हणाले.

    इयत्ता तिसरी,चौथी व पाचवी हा पूर्वतयारी स्तर असून या स्तरात मराठी,इंग्रजी व हिंदी या तीन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत.पाहिली दुसरीत विद्यार्थी तीन भाषा शिकणार आहे. घोकं पट्टीवर भर न देता क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे.इयत्ता सहावी,सातवी ,आठवी हा पूर्व माध्यमिक स्तर असून यात मराठी,इंग्रजी भाषेबरोबरच हिंदी,संस्कृत तसेच अन्य भारतीय भाषा व जर्मन सारख्या परकीय भाषा शिकण्याचा पर्याय प्रथमच विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने परदेशात नोकरी व शिक्षणाच्या सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे .याच स्तरावर व्यवसाय पूर्व शिक्षण कौशल्ये विकसित करण्यात येणार असून वर्षातील १० दिवस दप्तर मुक्त शाळा राहणार आहे या काळात विद्यार्थी सुतार काम,धातू काम,बाग काम, कुंभार काम,इलेक्ट्रिक काम ,कोडींग शिकतील.इयत्ता नववी,दहावी, अकरावी,बारावी हा माध्यमिक स्तर असून या स्तरात व्यावसायिक शिक्षण,आर्टिफिशियल इंटेलिजन्स व आंतर विद्या शाखीय क्षेत्रातील शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अकरावी ,बारावीत कला,विज्ञान,शाखेतील विद्यार्थी इतर शाखेतील विषय घेऊ शकतील अशी तरतूद या धोरणात करण्यात आली आहे.विद्यमान धोरणात वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षणाला सुरुवात होते.नवीन धोरणानुसार वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शिक्षणाला सुरुवात होणार असल्याचे ते म्हणाले.

    प्रत्येक मूल शिकले पाहिजे,शाळेत आले पाहिजे वैश्विक नागरिक बनले पाहिजे यावर भर देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.आता डी एड विषय संपला असून बारावी नंतर चार वर्षाचे बी एड,तीन वर्षाच्या पदवी नंतर दोन वर्षाचे तर चार वर्षाच्या पदवी नंतर एक वर्षाचे बी एड  तसेच शिक्षकांना दरवर्षी किमान ५० तासांचे सेवांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य  असल्याचे ते म्हणाले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावण वाघ यांनी केले. आभार अशोक कासार यांनी मानले. अनिल आवारे यांनी सूत्र संचालन केले.यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


गट कार्य सादर करतांना प्रशिक्षणार्थी


गट कार्य सादर करतांना प्रशिक्षणार्थी


गट कार्य सादर करतांना प्रशिक्षणार्थी


गट कार्य सादर करतांना प्रशिक्षणार्थी


प्रशिक्षण समन्वयक संदीप गीते साहेब यांचा सत्कार करतांना श्रावण वाघ सर व अनिल आवारे सर


तज्ज्ञ मार्गदर्शक मारुती सोनवणे यांचा सत्कार करतांना दीपक गडाख सर



तज्ज्ञ मार्गदर्शक योगेश शेवरे यांचा सत्कार करतांना 
अशोक कासार सर व संदीप काकड सर


तज्ज्ञ मार्गदर्शक चंद्रशेखर उदावंत यांचा सत्कार करतांना सोमनाथ पानसरे सर 



तज्ज्ञ मार्गदर्शक दीपक भालेराव यांचा सत्कार करतांना सागर भालेराव सर व अनिल आवारे सर


कुल क्रमांक तीनच्या वतीने मार्गदर्शकांचे सत्कार


गट कार्य सादर करतांना कुल तीनचे प्रशिक्षणार्थी सोबत मार्गदर्शक अंकुश सहाणे 


गट कार्य सादर करतांना प्रशिक्षणार्थी


प्रशिक्षणार्थी कुल क्रमांक एक 


तज्ज्ञ मार्गदर्शक अंकुश सहाणे यांचा सत्कार 


तज्ज्ञ मार्गदर्शक संजय खरात यांचा सत्कार


तज्ज्ञ मार्गदर्शक देवबा देवरे यांचा सत्कार


टिप्पण्या