💧💧💧💧💧💧💧💧
*२२ मार्च*
*जागतिक जल दिन*
दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघ (UNO) च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे.
*पाण्याशी संबंधित प्रश्न कोणते ?*
# पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?
# पावसाच्या पध्दतीत होणार्या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?
# भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?
# नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?
# तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?
# पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?
# पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?
# पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?
# पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?
# पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?
*आपली भूमिका काय ?*
# स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे.
# पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे.
लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’. प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो, ऊद्याची तहान भागवण्यासाठी.
*जागतिक जल दिन का साजरा केला जातो? महत्व आणि इतिहास*
पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच 'जल है तो जीवन हे' असे मानले जाते. आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जागरूक करण्यासाठी जगभरात दरवर्षी २२ मार्च हा 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो.
*जागतिक जल दिनाचा इतिहास काय?*
जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.
*जागतिक जल दिनाचे महत्व*
संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईटनुसार जागतिक जल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता हे आहे. त्यासाठी पाणी जपून वापरणे आणि पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्याला समर्थन करणे. पाणी वाचवणे हे किती गरजेचे आहे, याचे महत्व लोकांना पटवून देणे हे देखील गरजेचे आहे.
पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे. ते आपले मूळ स्त्रोत आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या येऊ शकतात. पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा