*डि.एड्. बांधवा जागा हो,* *संघर्षाचा धागा हो .............!!!

 

(जोर जुल्म की टक्करमे संघर्ष हमारा नारा है !)

*डि.एड्. बांधवा जागा हो,*

*संघर्षाचा धागा हो .............!!!*


नमस्कार मंडळी,

                     

आहो, शाळेत पोषण आहार प्रमुख पाहिजे, 

         मग हाय ना डि.एड्. धारक......

आहो, शाळात गुरूकुल विभाग प्रमुख पाहिजे, 

         मग हाय ना डि.एड्. धारक.........

आहो, शाळात परिक्षा विभाग प्रमुख पाहिजे, 

      मग हाय ना डि.एड्. धारक.........

आहो, शाळात शिष्यवृत्ती विभाग प्रमुख पाहिजे, 

       मग हाय ना डि.एड्. धारक...........

आहो, शाळेतुन ट्रेनिंगला शिक्षक पाठवायचा आहे,            मग हाय ना डि.एड्. धारक........

आहो, पंचायत समितीत काम आहे, 

      मग हाय ना डि.एड्. धारक.......

आहो, .............

थांबा,....! मुख्याध्यापक मिटींग आहे, प्रतिनिधी म्हणून, ..डी एड चालतो...

प्रगत- अप्रगत, शाळा सिध्दी, क्रिडा, कला, स्वच्छता, शाळा बाह्य, एखादा बी.एड्. धारक कमी आहे .....अस कोणतही काम असेल, सरळ डि.एड्. धारक पाठवा....अरे बाबांनो तो अष्टपैलू आहे ....बिनधास्त पाठवा त्याला.... यत त्याला सगळ !👍


एक शेवटच विचारायच हाय .....


हं......


शाळत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक प्रमोशन हाय, पाठवायच का जेष्ठ डि.एड्. धारकाला ????


😡 डोस्क फिरल का काय तुमचं ?

काय यत त्या डी एड वाल्याला ? नाही म्हणल तरी शेवटी डी एड च ! त्याला प्रमोशन कसं देता येईल? काय म्हणता ? त्यो डी एड १० वी १२ वी ला गुणवत्तेत होता.पदवीला पण डिस्टिंक्शन आहे.आर आसल पण शेवटी बी.एड्. वालाच प्रमोशनला हवा.*



       मित्रांनो अख्खी शाळा डि.एड्. वाला चालवेल पण फक्त उपशिक्षक म्हणुन......

 मुख्याध्यापक खुर्चीत बसुन चालवतो म्हटले की अहंकार जागा होतो......

मराठी,इंग्रजी,हिंदी पासून ते कला, कार्यानुभव कोणतेही विषय डि.एड्. वाला शिकवायला तयार...... 

*जिथे कमी,  तिथे आम्ही (डि.एड्.)*


              मात्र मुख्याध्यापक, पर्यवेक्षक मात्र फक्त बी.एड्. धारक पाहिजे. 

का ???? तर आम्ही घोडे   व तुम्ही गाढव, 

आम्ही राजहंस तर तुम्ही कावळे, 

किती हा भेदा-भेद ???

शाखेतील प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून काम करतो, किंबहुना एक पाऊल पुढेच असतो.....सर्व विभागांचा अनुभव असणारा, मुख्याध्यापक बनु शकत नाही ???

          किती दिवस आपण कमीपना स्विकारून राहायचे ??? राजपत्राने आपल्याला आपल्या हक्काचे दिले आहे. मात्र हे डोळ्यात खुपल्याने हे लोक आडवे येत आहेत. *डि.एड्. धारक फक्त बघत राहणार का ????* 

        बघु, लढणारे लढतील मी बघत बसणार ! तुम लडो  हम कपडे संभालते है l लढणारे लढतच आहे, आपण त्यांना पाठबळ द्यायचे आहे व ते कोरडे पाठबळ नको आहे. कारण रसद नसेल तर कितीही पराक्रमी सैन्य असले तरी त्यांची हार निश्चित असते. *मग आपण षंढा प्रमाणे रसदी शिवाय आपले सैन्य हारताना पाहत राहणार का???*

                 *मित्रांनो, षंढ बनुन जगण्यापेक्षा, बंड करून लढलेले बेहत्तर* 

तेंव्हा आपण आपला लढ्यातील हिस्सा उचला. डि.एड्. असो की बी.एड्.? शेवटी शिक्षकच आहे. त्यात भेदभाव कसला करत आहात ??? आणि आपण तरी किती दिवस हा भेदभाव सहन करायचा ???? उठा जागे व्हा आणि आपले लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय शांत बसू नका !

        (पोस्ट कोणाची आहे माहीत नाही पण आवडली म्हणून शेअर केली )


टिप्पण्या

  1. एकदम सत्य आहे.
    डीएड बांधव सर्व गुण संपन्न असतात .कशातच कमी पडत नाही म्हणून बीएड नाही म्हणून त्यांना डावलन हा मूर्खपणा ठरतो .हा देश चालवण्यासाठी हे राज्य चालवण्यासाठी b.ed शैक्षणिक पात्रता लागत नाही तर तेवढी त्याची हुशारी पाहिजे. यासाठी माझा बांधव व भगिनी सरस आहे उजवी आहे .प्रत्येक शाळेत ऑब्झर्वेशन करून बघा शाळेत जास्ती काम कोण करते आपोआप आपल्याला कळेल कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे कामाबाबत म्हणतोय बरं!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा