गोवर्धन पतसंस्थेच्या वतीने सोनांबे येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात!! गो फॉर गोवर्धन टॅग लाईन ठरली आकर्षणाचा बिंदू!

 यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक व मान्यवर

 प्रास्ताविक करतांना चेअरमन शरद रत्नाकर 

 विनय पवार यांचा सत्कार करतांना         मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर 


सिने अभिनेते डॉ सुयोग गोऱ्हे यांचा सत्कार करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ पाटील पवार 

   मॅरेथॉन स्पर्धेत मुलींच्या गटातून प्रथम           आलेली औंढेवाडी एक्स्प्रेस रंजना कुंदे 

मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटातून 
प्रथम आलेला दर्शन वलवे 

चित्रकला स्पर्धा मोठा गट प्रथम वेदिका कडभाणे

चित्रकला स्पर्धा लहान गट प्रथम समृध्दी वारूंगसे 



गोवर्धन पतसंस्थेच्या वतीने सोनांबे येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात!

     सोनांबे येथील गोवर्धन पतसंस्थेच्यावतीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते 

   या स्पर्धेत जनता विद्यालय सोनांबे,जनता विद्यालय कोनांबे,साई नारायण गुरुकुल या शाळांमधील १०० मुलामुलींनी सहभाग घेतला.इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.गो फॉर गोवर्धन हे घोषवाक्य स्पर्धेचे आकर्षण ठरले.आर्ट कन्स्ट्रक्शनचे संचालक अनिल पवार व राजेंद्र भावसार यांनी या स्पर्धा पुरस्कृत केल्या .स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटण्यात आले.संस्था कार्यालयात "मी पाहिलेली सहकारी संस्था"या विषयावर विद्यार्थ्यांनी काढलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.मुलींच्या गटाला सरपंच जनार्दन पवार व सोसायटीचे चेअरमन तानाजी पवार यांनी तर मुलांच्या गटाला सिने अभिनेते डॉ सुयोग गोऱ्हे व अमेरिका निवासी विनय पवार यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.मुलींसाठी ३ किमी तर मुलांसाठी ४ किमी अंतर निश्चित करण्यात आले होते.मुलांच्या गटात साई नारायण गुरुकुलातील दर्शन शरद वलवे तर मुलींच्या गटात रंजना हिरामण कूंदे प्रथम आली श्रीराम शंकर आव्हाड व अक्षरा शिवाजी डगळे द्वितीय व कोनांबे जनता विद्यालयातील यश द्वारकानाथ पानगव्हाणे कोमल मधुकर डावरे तृतीय आले विश्वास शिवाजी डगळे,अमर चिंतामण डगळे व तस्किन निसार शेख व संचीता संजय खेताडे अनुक्रमे चवथे व पाचवे आले.

   पतसंस्थेने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणाही यावेळी करण्यात आली .लहान गटातून समृध्दी संदीप वारुंगसे प्रथम सिद्धिका सोमनाथ पवार द्वितीय तर स्नेहल संतोष कडभाणे तृतीय आली. मोठ्या गटातून याच स्पर्धेत वेदिका नामदेव कडभाने प्रथम मनोज भगवान शेळके द्वितीय तर श्लोक कचरू जोंधळे तृतीय आला.

   यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व रोख बक्षिसे देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.मविप्र संस्थेचे ज्येष्ठ सभासद दशरथ पाटील पवार यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. संस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर यांनी प्रास्ताविक केले.मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर,अभिनेते डॉ सुयोग गोऱ्हे यांनी मनोगत व्यक्त केले.शांताराम चांदोरे यांनी आभार मानले. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

  शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार,सदस्य निवृत्ती बोडके,सरपंच जनार्दन पवार,सोसायटीचे चेअरमन तानाजी पवार,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दामू अण्णा बोडके,लेखक रमेश पवार,संचालक अनिल अण्णा पवार,सलीम शेख,भाऊसाहेब पवार,शुभम डावरे,दीपक वारुंगसे,संतोष डावरे,दत्तात्रय पवार सर, प्रायोजक अनिल पवार,माजी सरपंच संजय बोडके,दशरथ बोडके, आदी मंचावर उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कविता राऊत ह्या धावपटू सावरपाडा या छोट्याशा पाड्यातून पुढे आल्या व सावरपाडा एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाऊ लागल्या शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात त्यांचा धडा सुद्धा आहे.त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन औंढेवाडी या दुर्गम आदिवासी गावातून सोनांबे विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या रंजना कुंदे  प्रथम क्रमांकाने ही स्पर्धा जिंकल्याने तिची भविष्यात *औंढेवाडी एक्स्प्रेस* नावाने ओळख निर्माण व्हावी असा आशावाद तिचे क्रीडा शिक्षक दीपक पगारे यांनी व्यक्त केला. या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या मविप्र मॅरेथॉन स्पर्धांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी घवघवीत यश संपादन करतील असा विश्वास मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर यांनी प्रकट केला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक संदीप घोडे, विनोद रोकडे, सुदाम साबळे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या