विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेचा व शिक्षकांचा सिंहाचा वाटा -- लेफनंट कर्नल संदीप वाबळे

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेचा व शिक्षकांचा सिंहाचा वाटा - लेफनंट कर्नल संदीप वाबळे 

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेचा व शिक्षकांचा सिंहाचा वाटा असून शाळेमुळेच आपण उच्च पदावर पोहचलो असे प्रतिपादन लेफनंट कर्नल संदीप वाबळे यांनी केले 

    ते सोनांबे जनता विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सैनिक चषक चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार होते सरपंच जनार्दन पवार,निवृत्ती पवार सर,सुरेश वाबळे,नंदू वाबळे,अक्षय पवार,रोहित वाबळे ,सुजित पवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे,पर्यवेक्षक शिवनाथ पांगारकर आदी मंचावर उपस्थित होते 

          विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुण जोपासावेत यासाठी बंधू दिवंगत जवान अरुण वाबळे यांच्या स्मरणार्थ सैनिक चषक चित्रकला स्पर्धा आयोजित केली असल्याचे ते पुढे म्हणाले.विद्यालयाला सीलिंग फॅन देण्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी केले.शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखवण्याची संधी अशा उपक्रमांमुळे मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी केले.

          विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवनाथ पांगारकर यांनी आभार मानले.योगिता शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

                  इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील यश गीते,सिध्दीका पवार,देवयानी वारूंगसे,प्रियांका पवार,स्नेहा जोंधळे तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातील कावेरी डावरे,प्रेरणा डावरे,अनुष्का खताळे,अक्षदा पवार,अनुष्का शिंदे या पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना यावेळी स्मृतिचिन्ह व प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक मिलिंद पाटील,संवेदीता जाधव,भाऊसाहेब दहिफळे आदींनी परिश्रम घेतले.


स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत मान्यवर .


निवृत्ती पवार सर यांचे मनोगत 


       लेफनंट कर्नल संदीप वाबळे यांचे मार्गदर्शन 


कै.जवान अरुण वाबळे प्रतिमापूजन.



सूत्रसंचालन करतांना योगिता शिंदे मॅडम













टिप्पण्या